वाडा पोलीस ठाण्यातील ११ आरोपींना कोरोनाची लागण

वाडा: पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नवे २६ रूग्ण आढळले असून यात वाडा तालुक्यातील वाडा पोलीस ठाण्यात गडचिंचले प्रकरणातील ११ आरोपींना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सांगितली जाते. या

 वाडा: पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नवे २६ रूग्ण आढळले असून यात वाडा तालुक्यातील वाडा पोलीस ठाण्यात गडचिंचले प्रकरणातील ११ आरोपींना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सांगितली जाते. या आरोपींचे १३ जून रोजी स्वॅब घेण्यात आले होते.त्यामुळे ११ जण पॉझिटिव्ह आल्याचे वाडा तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बुरपुले यांनी सांगितले.

आज पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ११,जव्हारमधील १२, डहाणू १,पालघर २ असे एकूण २६ रूग्ण आहेत.यात ३ महिला व २३ पुरुष आहेत. यामुळे पालघर जिल्ह्यातील एकूण संख्या सकाळपर्यंत ४३४ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या अगोदर वाडा पोलीस ठाण्यात पालघरमधील गडचिंचले येथील कथित तिहेरी हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीला कोरोना लागण झाली होती. त्यावेळी आरोपीसह पोलीस कर्मचारी यांची कोरोना चाचणी घेतली होती. हा दुसऱ्यांदा प्रकार घडला आहे. या प्रकारात वाडा तहसील कार्यालय दोन दिवस बंद ठेऊन त्याचा कारभार नजीकच्या प्रांत कार्यालय येथून चालेल, असे वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी सांगितले. त्याच बरोबर काही दिवसांपूर्वी वाडा तालुक्यातील ब्ल्यू स्टार कंपनीत पालघर जिल्ह्याबाहेरील एक कामगाराला कोरोनाची लागण झाली आहे .त्याच्या संपर्कातील ११ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली.