hacker

मुंब्रा परिसरात असलेलेई असदुल्ला खान हायस्कूल आणि जुनियर कॉलेज आहे. या शैक्षणिक संस्थेत तब्बल ३५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या माध्यमातून एक इमेल आयडी ASADULLAHKHANENGLISHSCHOOL@GMAIL.COM हा  तयार करण्यात आलेला होता. सदर ईमेलचा  वापर हा शाळेचे आणि जुनियर कॉलेजचे कार्यक्रम, अभ्यासक्रम, विविध मार्गदर्शन करणारे व्हिडीओ अपलोड  करण्यात येत होते.

ठाणे : मुंब्रा (Mumbra) परिसरातील एका माध्यमिक शाळा आणि जुनियर कॉलेजचा ईमेल आयडी अज्ञात इसमाने हॅक केला. (Email ID of school in Mumbra hacked) सदर ईमेलची नोंदणीचा नंबरही बदलण्यात आला. हॅकर्सने (hacker)  शाळेच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ अपलोड होत नाही. म्हणून केलेल्या अधिक चौकशीत शाळेचा ईमेल आयडी हॅक झाल्याचे समोर आले. शाळा आणि ज्युनियर कॉलेजचे संचालक असदुल्लाह खान यांनी याबाबत १० आक्टोंबर, २०२० रोजी सायबर विभागाकडे लेखी तक्रारही  केली. मात्र अद्याप कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याचे असदुल्ला खान यांनी सांगितले.

मुंब्रा परिसरात असलेलेई असदुल्ला खान हायस्कूल आणि जुनियर कॉलेज आहे. या शैक्षणिक संस्थेत तब्बल ३५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या माध्यमातून एक इमेल आयडी ASADULLAHKHANENGLISHSCHOOL@GMAIL.COM हा  तयार करण्यात आलेला होता. सदर ईमेलचा  वापर हा शाळेचे आणि जुनियर कॉलेजचे कार्यक्रम, अभ्यासक्रम, विविध मार्गदर्शन करणारे व्हिडीओ अपलोड  करण्यात येत होते.

याच शैक्षणिक संस्थेची शाखा सोलापूर येथे डिग्री कॉलेज सुरु कार्नाय्त आले होते. शाळेतील आणि कॉलेजमधील कुठलाही सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे व्हिडीओ हि याच ईमेल आयडीवर अपलोड करण्यात येत होते. दरम्यान शाळा आणि जुनियर कॉलेजचा ईमेल आयडी हॅक केल्याची माहिती शाळेच्या संचालक असादुल्लाह आणि त्यांचा मुलगा इबदुल्लाह खान यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शाळेचे व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न केल्यास ते अपलोड होत नव्हते. तर गुगलद्वारे ही नकारात्मक सूचना करण्यात येत होती. दरम्यान ईमेल हॅकर्सने ईमेल हॅक केला. ईमेलला जोडण्यात आलेला एक युट्युब चॅनेलही होता.

दरम्यान या चॅनलवर असलेले असदुल्लाह खान हायस्कुल आणि जुनियर कॉलेजद्वारा अपलोड करण्यात आलेले सर्व व्हिडीओ, कॉलेज, शाळेच्या शिक्षकांचे आणि प्रोफेसर यांची लेक्चरच्या चित्रफीत या टप्प्याटप्प्याने दिलीत करून टाकण्यात आल्या. सादर ईमेल आयडीचा नोंदणी क्रमांक आणि रिकव्हरी ईमेल देखील हॅकरने बदलून टाकल्याचे समोर आले. सदरची माहिती शाळा प्रशासनाला मिळताच त्यांनी १० /१०/२०२० रोजी सायबर सेलकडे लेखी तक्रार दाखल केली. तसेच गुगलकडे हि तक्रार केली. मात्र अद्याप पर्यंत कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. शाळेचा आणि जुनियर कॉलेजचा ईमेल आयडी हॅक करण्यामागचे षडयंत्र काय? शाळा आणि जुनियर कॉलेजचा ईमेल आयडी हॅक करणारा हॅकर्स याचे लोकेशन ठाणे आणि मुंब्रा दाखवीत असल्याची माहिती संचालक असादुल्लाह खान यांनी दिली.

 hackr