रोजगार मिळण्यासाठी कुठे करावी नोंदणी, जाणून घ्या

पालघर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हयातून मजूर कामगार वर्ग औद्योगिक आस्थापनेवरून स्वत:च्या गावी परतला आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांवरील मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे

 पालघर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हयातून मजूर कामगार वर्ग औद्योगिक आस्थापनेवरून स्वत:च्या गावी परतला आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांवरील मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे  त्यामुळे गरजु बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी आपली नोंदणी तातडीने www.mahaswayam.gov.in या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवानुसार उमेदवाराला नोकरीची संधी मिळेल.  कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची आस्थापनाचे कर्मिक व्यवस्थापक किंवा संचालक आवश्यक मुनष्यबळाची मागणी संकेतस्थळ किंवा अॅपवर नोंदवू शकतात .