Everyone will now come forward to take credit for the development work, said MLA Ravindra Chavan

पूर्वेकडील देसलेपाडा नवनीतनगर येथील पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या शुभारंभप्रसंगी भाजपा आमदार रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी नगरसेविका रविना माळी, प्रसाद माळी, राजेंद्र पाटील यांच्यासह नवनीतनगर येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

डोंबिवली : अमृत योजने अंतर्गत पाण्याच्या पाईप लाईन्स टाकण्याचे काम गावापासून शहरापर्यंत सुरु आहे. त्यामुळे आता भविष्यात पाण्यासाठी कोणाच्याही तक्रारी येणार नाहीत. विशेष म्हणजे आज देसले पाड्यातील नवनीत नगरात सर्वात प्रथम पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच शुभारंभ होत आहे. विकास कामांचे (development work) श्रेय घेण्यासाठी आता सर्वजण पुढे येतील पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास आणि विश्वास धोरणामुळे विकास कामांची पूर्तता होत आहे असे वक्तव्य आमदार रवींद्र चव्हाण (MLA Ravindra Chavan) यांनी डोंबिवलीत केले.

पूर्वेकडील देसलेपाडा नवनीतनगर येथील पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या शुभारंभप्रसंगी भाजपा आमदार रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी नगरसेविका रविना माळी, प्रसाद माळी, राजेंद्र पाटील यांच्यासह नवनीतनगर येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

आमदार चव्हाण पुढे म्हणाले,पूर्वी छोटसी गाव असत, त्यावेळीही पाण्याची समस्या होती, ती सोडविण्यासाठी पूर्वी विहिरी खोदून पाण्याची पूर्तता केली जात होती. पण आता वस्ती मोठी झाली. त्यामुळे ठोस नियोजन करण गरजेचे होते. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बारवी धरणाची उंची वाढविण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्यासाठी धरणाच्या आसपासच्या जमिनी घेवून तेथील नागरिकांचे पुनर्वसन केले. अशा पायाभूत विकास कामांमुळे आता बारवी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता दुप्पट झाली आहे. ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर कल्याण डोंबिवली तसेच ग्रामीण विभागातील नागरिकांना आता पाण्याची समस्या भेडसावणार नाही. आता पाणी मुबलक आहे आणि ते सर्वांना मिळाले पाहिजे म्हणून सम-पंप योजना आणि मोठ्या पाणी साठविण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत.

यावेळी अमर माळी म्हणाले, अमृत योजनामुळे स्थानिक आमदार राजू पाटील, भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण, नगरसेविका रविना माळी यांच्या पाठपुराव्यामुळे नगरवासीयांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. पूर्वी रोज २५ ते ३० टंकरने पाणीपुरवठा केला जात होता. पावसाळ्यांत एक नवीन येथे अधिक पाण्याची लाईन सुरु केली आणि टँकरपाणी बंद केले. पण आता कायमची समस्या दूर होणार आहे.  तर रविना माळी म्हणाल्या येथील नागरिकांना फार त्रास सहन करावा लागला. पाण्याचे प्रेशर कमी होते आता नवीन पाईपलाईन टाकण्यास सुरुवात झाली आहे. आता नक्की भरपूर पाणी मिळेल याचा आनंद होईल.