भिवंडीत कोरोना परिस्थिती निवळण्यात सर्वांचे सहकार्य मोलाचे – आयुक्त डॉ.पंकज आशिया

भिवंडी शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणून रुग्ण दुपट्टीचा कालावधी तब्बल १३० दिवसांवर पोहचला असून ,राज्यात महानगरपालिका क्षेत्रात तो सर्वोत्तम असून भिवंडी शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती निवळण्यात प्रशासनासोबत शहरातील नागरीक ,पोलीस यंत्रणा ,सेवाभावी संस्था ,खाजगी डॉक्टर्स संघटना या सर्वांचे प्रयत्न कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया भिवंडी महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे.

भिवंडी : राज्यात कोरोना परिस्थिती अजूनही निवळत नसताना भिवंडी शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणून रुग्ण दुपट्टीचा कालावधी तब्बल १३० दिवसांवर पोहचला असून ,राज्यात महानगरपालिका क्षेत्रात तो सर्वोत्तम असून भिवंडी शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती निवळण्यात प्रशासनासोबत शहरातील नागरीक ,पोलीस यंत्रणा ,सेवाभावी संस्था ,खाजगी डॉक्टर्स संघटना या सर्वांचे प्रयत्न कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया भिवंडी महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे.     

क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्या व मृत्यू संख्या झपाट्याने वाढत असताना जुलै महिन्याच्या उत्तरार्थत नव्याने आयुक्त म्हणून रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील डॉ पंकज आशिया यांनी अवलंबिलेल्या चार सूत्री उपाययोजना कामी आल्या असल्याने त्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे . भिवंडीत रुग्णांसाठी रुग्णालय व रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी सर्वप्रथम पाऊले उचलल्यानंतर आयजीएम या शासकीय कोव्हिड रुग्णालयात ऑक्सीजन टॅंक उभारणी करून सर्व बेड ऑक्सीजन लाईनने जोडले गेले तर शहरातील दोन सांस्कृतिक सभागृहात महानगरपालिका वतीने तब्बल २६० ऑक्सीजन बेडची व्यवस्था करून दिल्यावर त्या ठिकाणी मोफत उपचार होत असल्याचा विश्वास नागरीकांमध्ये  निर्माण करण्यात महानगरपालिका प्रशासन यशस्वी झाल्याने रुग्ण स्वतःहून तपासणीसाठी पुढे आले.

शहरात सुरू केलेल्या ३० मोहल्ला क्लिनिक कडून मोहल्ल्या मोहल्ल्यात तर शिक्षक व महानगरपालिका कर्मचारी यांच्या ४७८ पथकांकडून घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात अनेक संशयित रुग्ण आढळून आल्या नंतर तात्काळ त्यांची तपासणी तर त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना आरोग्य विभागाने अलगिकरण केल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनास यश मिळाले असून सध्या शहरात कोव्हिड रुग्णालयातील ९० टक्के बेड रिकामे असून शहरात ९०० ऑक्सीजन सुविधा असलेले बेड उपलब्ध असून ते सध्या रिकामे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा उपयोग होत आहे असे डॉ. पंकज आशिया यांनी स्पष्ट केले.         

भिवंडी शहरातील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना डॉ. पंकज आशिया यांनी कोरोनाला अटकाव फक्त प्रशासन करू शकत नसून राज्य केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत असताना भिवंडी शहरातील नागरीकांचे सहकार्य ,धार्मिक गुरू ,स्वयंसेवी संस्था ,पोलीस प्रशासन व इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स मंडळीं या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळत असताना महानगरपालिका कर्मचारी यांनी घेतलेली दिवसरात्र मेहनत या सर्वांच्या सामुहीक प्रयत्नातून  आपण भिवंडी शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो आहोत. अशी प्रतिक्रीया आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी शेवटी दिली.