गौरीपाडा परिसरात सुरु करा लसीकरण केंद्र, माजी शिक्षण मंडळ सभापतींची मागणी

गौरीपाडा भागात(emand to start vaccination centre in gauripada area) नागरिकांच्या सुविधेसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे ,अशी मागणी माजी शिक्षण मंडळ सभापती, स्थानिक माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आश्विनी पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

    कल्याण : कोरोनाचा शहरामध्ये होणारा उद्रेक(Corona Paitents in Kalyan Dombivali) कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता गौरीपाडा भागात नागरिकांच्या सुविधेसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे ,अशी मागणी माजी शिक्षण मंडळ सभापती, स्थानिक माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आश्विनी पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

    देशात व राज्यात कोरोनाचा उद्रेकामुळे कोरोना रूग्णांचा आलेख वाढला. मनपा क्षेत्रात देखील कोरोना रूग्णांची एप्रिल महिन्यातील वाढती संख्या हजार च्या वर गेली होती. गौरीपाड्यात देखील कोरोना रूग्ण आढळत असल्याने परिसरातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.

    गौरीपाडा परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी गौरीपाडा प्रभागात लसीकरण केंन्द्र सुरू होणे बाबत माजी शिक्षण मंडळ सभापती दया गायकवाड यांनी पुढाकार घेऊन मनपा आयुक्त व मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले. गौरीपाडा परिसरातील नागरिकांना कोवीड प्रतिबंधात्मक लसीकरण सुविधेसाठी लसीकरण केंद्र तातडीने सुरू करावे यासाठी प्रभागात जागा उपलब्ध असुन आपल्या जनहिताच्या पाठपुराव्यास निश्चित यश प्राप्त होऊन अल्पावधीतच प्रशासन कोवीड लसीकरण केंद्र सुरु करेल असे यानिमित्ताने माजी शिक्षण मंडळ सभापती दया गायकवाड यांनी सांगितले.