Excitement over the discovery of unidentified bodies under the Raita river bridge sj

कल्याण मुरबाड रोडवर असलेल्या रायता गावाजवळ असलेल्या नदीच्या पुलाखाली आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सदर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण :  कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत रायता या गावाजवळ असलेल्या उल्हास नदी पुला खाली एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

कल्याण मुरबाड रोडवर असलेल्या रायता गावाजवळ असलेल्या नदीच्या पुलाखाली आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सदर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह हा पुरुषाचा असून अंदाजे वय ४०- ते ४५ असावे तसेच दोन दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. मात्र अपघात की घातपात या बाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून सदर मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला असून.

पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलिस उप निरीक्षक प्रदिप आरोटे करत आहेत.