Crime

भिवंडी(bhivandi) शहरात अनधिकृत इमारत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्स मंडळींकडून उच्च न्यायालयात रिट पिटीशन(rit petition) दाखल करून खंडणी(extortion) उकळण्याच्या प्रकरणी भिवंडी एमआयएम(mim) शहराध्यक्ष खालिद ( गुड्डू ) मुख्तार शेख या विरोधात पाचवा गुन्हा निजामपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून खालिद गुड्डू याच्या अडचणीत वाढ झाली आहे .

भिवंडी : भिवंडी(bhivandi) शहरात अनधिकृत इमारत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्स मंडळींकडून उच्च न्यायालयात रिट पिटीशन(rit petition) दाखल करून खंडणी(extortion) उकळण्याच्या प्रकरणी भिवंडी एमआयएम(mim) शहराध्यक्ष खालिद ( गुड्डू ) मुख्तार शेख या विरोधात पाचवा गुन्हा निजामपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून खालिद गुड्डू याच्या अडचणीत वाढ झाली आहे .

अवचित पाडा येथील कलिम अहमद मोहम्मद मोबिन अन्सारी याने आपल्या सर्व्हे क्रमांक ४७ , सिटी सर्व्हे क्रमांक ४३६७ या जागेवर इमारत उभारणीचे काम सुरू केले. त्यावेळी खालिद गुड्डू याचे साथीदार अब्दुल्ला अब्दुल लतीफ सय्यद रा. निजमपुरा व हमीद शेख,रा. मिल्लत नगर यांनी इमारत बांधकामा विरोधात आरोपी यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन क्रमांक ४१६४/ २०१८ दाखल केली. त्याद्वारे इमारत पडण्याची कारवाई करू व जास्त हुशारी केल्यास तुझ्यासोबत काय करतो बघ अशी धमकी देत व भीती दाखवीत कारवाई टाळण्यासाठी व रिट पिटीशीयन मागे घेण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी ५ लाख रुपयांची खंडणी स्वीकारल्याबद्दल तक्रारदार कलिम अहमद मोहम्मद मोबिन अन्सारी याने निजामपूरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी खालिद गुड्डू व त्याचे साथीदार अब्दुल्ला अब्दुल लतीफ सय्यद व हमीद शेख यांच्या विरोधात भादंवि कलम ३८४,३८५,३८६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यातील खालिद गुड्डू व हमीद शेख यांना यापूर्वीच खंडणीच्या इतर गुन्ह्यात अटक केली आहे या गुन्ह्याचा तपास सह पोलीस निरीक्षक डी. डी. मारणे हे करीत आहेत.