sweet shop

ठाणे : अन्न व औषधी प्रशासनाद्वारे अन्नात भेसळ करणाऱ्याच्या विरोधात धडक कारवाई(action by fda) कोकण विभागात करण्यात आली. या धडक कारवाईत मावा, खवा , तेलासह अशा विविध अन्न पदार्थाचे २५९ नमुने तपासणीसाठी घेऊन तब्बल ४२ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकारी यांनी दिली.

सणासुदीत मिठाई, तेल, घी सारख्या गीष्टींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. तसेच त्यांची खरेदी आणि विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. तर दुसरीकडे मिठाई बनविणारे व्यापारी हेही मोठ्या प्रमाणात मिठाई बनवितात. यात भेसळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे अशावेळी अन्न व औषधी प्रशासनाची भरारी पथके कार्यरत असतात.

गेल्या दोन महिन्यात कोकण विभागात राबविण्यात आलेल्या अन्न व औषधी प्रशासनाच्या मोहिमेत पथकाने धडक कारवाई केली. तब्बल ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एफडीएच्या कोकण विभागाने गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी, अर्थात २० ऑगस्टपासून फेस्टिव्हल ड्राइव्हला सुरुवात केली होती. नवरात्रोत्सवापर्यंत चालू असलेल्या या ड्राइव्हमध्ये ४६२ किलो खवा, मावा जप्त करण्यात आला असून याची एकूण किंमत ८९ हजार १२४ रु. आहे. एकूण पाच नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. तसेच तेल, तूपासह अन्य असा एकूण ४० लाख ३८ हजार ८८६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर ६४ नमुने चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. मिठाईचे ३६ नमुने घेण्यात आल्याची माहिती सह आयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांनी दिली. याशिवाय इतर पदार्थांचा एक लाख ६६ हजार ७२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १५४ नमुनेही घेण्यात आले आहेत. याबाबत अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी वीरेंद्र पुनाईकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.