ठाण्यात एफडीएची धाड ; पामतेलाची भेसळ करून पनीर उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई

व्यापक जन आरोग्य हितासाठी (Public health interests) पुढील आदेशापर्यंत उत्पादन (Production) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जप्त साठ्यांपैकी पनीर (Cheese) व दूध (Milk) हे नाशवंत असल्यामुळे जमिनीत गाडून नष्ट करण्यात आले. अन्न व औषधी प्रशासन यांनी माहिती वरुन सदरची कारवाई केली. जप्त भेसळ पनीर नष्ट केले.

ठाणे : विना परवाना पनीर उत्पादनाचा ( Cheese production )  व्यवसाय करणार्‍या शिवम डेअरी फार्म (Shivam Dairy Farm) , गाळा नं ५३५, विलास इंडस्ट्रीयल इस्टेट (Vilas Industrial Estate) , रामबाग, उपवन ठाणे या ठिकाणी छापा मारुन पनीरसह अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड, पामोलीन तेल, मिल्क पावडर (Milk Powder ) व स्किम्ड मिल्क असे ५ नमुने तपासणीसाठी घेऊन एकूण १,६१,६२२ रु. चा साठा जप्त करण्यात आला आहे.

व्यापक जन आरोग्य हितासाठी पुढील आदेशापर्यंत उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जप्त साठ्यांपैकी पनीर व दूध हे नाशवंत असल्यामुळे जमिनीत गाडून नष्ट करण्यात आले. अन्न व औषधी प्रशासन यांनी माहिती वरुन सदरची कारवाई केली. जप्त भेसळ पनीर नष्ट केले.

सदरची कारवाई एफ डी ए आयुक्त अभिमन्यु काळे,कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल, अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.रा.द. मुंडे यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी व्यंकटेश वेदपाठक यांच्या मदतीने पार पाडली.