कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शुन्य कचरा मोहिमेला प्रतिसाद देत टिटवाळ्यातील सोसायटीत कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरु

कल्याण : कल्याण डोंबिवली घनकचरा विभागाने शुन्य कचरा मोहिमे अंतर्गत व्यापक जनजागृती सुरू ठेवली असुन आधारवाडी डम्पिंगवर होणारा कचाऱ्याचा डोंगर कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस भुमिका घेत महापालिका

कल्याण : कल्याण डोंबिवली घनकचरा विभागाने शुन्य कचरा मोहिमे अंतर्गत व्यापक जनजागृती सुरू ठेवली असुन आधारवाडी डम्पिंगवर होणारा कचाऱ्याचा डोंगर कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस भुमिका घेत महापालिका क्षेत्रात ओला सुका कचरा वेगळा केलेला असला तरच कचरा स्विकारला जाईल अशी ठोस भुमिका घेतली. तसेच कचरा कुंडी मुक्त धोरणाची अमंलबजावणी सुरु केली असुन घनकचरा व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू करून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. ओला व सुका कचऱ्याबाबत व्यापक जनजागृती सुरू केली. या शुन्य कचरा मोहिमेला प्रतिसाद देत टिटवाळ्यातील हरि ओम सोसयटीने सोसयटीने  सोसयटीच्या जागेत बेड तयार करून ओल्या कचऱ्याचे विघटन करीत त्याचे खतामध्ये  रुपांतर करण्याचा प्रकल्प रविवारी गटनेता नगरसेवक संतोष तरे यांंच्या हस्ते सुरू केला. एक योग्य पायंडा घालीत हा सुत्य उपक्रम सुरु केला आहे. 

या निमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे  उप आयुक्त- घन कचरा व्यवस्थापन रामदास कोकरे, मनपा सचिव संजय जाधव , उपअभियांता मिलिंद गायकवाड,  ‘अ’  प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल,  मुख्य आरोग्य निरिक्षक राजेश गवाणकर, नगरसेवक संतोष तरे  या सर्वांचे मार्गदर्शन  लाभले.  टिटवाळातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नांदगावकर यांची मेहनत व  ईच्छाशक्ती तसेच हरी ओम व्हॅली सोसायटीचे अध्यक्ष अशोक डोंगरे,सर्व पदाधिकारी व सदस्य या सर्वांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे  शुन्य कचरा मोहिमेंतर्गत सोसयटी आवारात ओल्या कचऱ्यापासुन खत प्रकल्प सुरु झाला आहे. सोसयटीने अभिनव उपक्रम सुरू करून महानगरपालिकेच्या शुन्य कचरा मोहिमेला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविला आहे.