भिवंडीत ५२ नवे रुग्ण आढळले

भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे ३८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात १४ नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण व शहरात एकूण ५२ नवे रुग्ण

 भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे ३८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात १४ नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण व शहरात एकूण ५२ नवे रुग्ण आज आढळले आहेत. दरम्यान भिवंडी शहरात आतापर्यंत ४७० रुग्ण आढळले असून त्यापैकी १८० रुग्ण बरे झाले आहेत तर २१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून २६९ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत २४८ रुग्ण आढळले असून त्यापैकी ९८ रुग्ण बरे झाले आहेत तर चार रुग्णांचा मृत्यू झाला असून १४६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान शनिवारी आढळलेल्या ५२ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ७१८ वर पोहचला असून त्यापैकी २७८ रुग्ण बरे झाले आहेत तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४१५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.