fight competition in bhivandi

भिवंंडी शहरातील शांतीनगर , पिराणी पाडा परिसरात असलेल्या दहीया कंपाऊंड येथे भिवंडी फाईट क्लबच्यावतीने विना परवानगी  फाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे  दोन फायटर एका रिंगमध्ये प्रवेश करून फाईट करीत असतानाच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

भिवंडी: भिवंंडी(bhivandi) शहरातील शांतीनगर , पिराणी पाडा परिसरात असलेल्या दहीया कंपाऊंड येथे भिवंडी फाईट क्लबच्यावतीने विना परवानगी  फाईट स्पर्धेचे आयोजन(fight competition) करण्यात आले होते. विशेष म्हणजे  दोन फायटर एका रिंगमध्ये प्रवेश करून फाईट करीत असतानाच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मग वातावरण टाईट केले.त्यांनतर  शांतीनगर पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. सलमान अब्दुल कयुम असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव आहे.

सर्वत्र कोरोनाचा काळ सुरु असतानाच भिवंडीतील फाईट क्लबच्या आयोजकांनी शासनाने जाहीर केलेल्या कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे  पालन केले नाही. कुणीही चेहऱ्यावर मास्क लावलेले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडवला होता. विशेष म्हणजे ही फाईटची स्पर्धा  पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी  एकच गर्दी केली होती.

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश चौघुले यांच्या हस्ते फाईट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.विशेष म्हणजे या फाईट स्पर्धेत आमदारांचा मुलगाही सहभागी झाला होता. मात्र पोलिसांना या बेकायदा फाईट स्पर्धेची माहिती मिळताच पोलिसांनी येथील वातावरण टाईल केले.या प्रकरणी फाईट क्लबचे आयोजक सलमान अब्दुल कयुम याच्या विरोधात शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दरम्यान फाईट स्पर्धेसाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली होती. त्यामुळे मी स्पर्धेचे उद्घाटन केल्याचे आमदार महेश चौघुले यांनी सांगितले आहे.