प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शहराला लागून असलेल्या खाडीचे खारे पाणी गोड करण्याचा अजब प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पटलनावर मांडण्यात आला होता. मात्र या प्रक्रियेला खर्च असल्यामुळे हा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या इतिहासात जे घडणार नव्हते ते घडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना इच्छा होती,मात्र उशिरा सुचलेल्या शहाणनामुळे या प्रकल्पाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याने ठाणेकरांचा पैसे पाण्यासारखा वाहून जाता जाता राहिला आहे. मात्र या प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारावरील १५ लाखांचा खर्चही आता पाण्यात गेला आहे.

ठाणे (Thane).  शहराला लागून असलेल्या खाडीचे खारे पाणी गोड करण्याचा अजब प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पटलनावर मांडण्यात आला होता. मात्र या प्रक्रियेला खर्च असल्यामुळे हा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या इतिहासात जे घडणार नव्हते ते घडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना इच्छा होती,मात्र उशिरा सुचलेल्या शहाणनामुळे या प्रकल्पाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याने ठाणेकरांचा पैसे पाण्यासारखा वाहून जाता जाता राहिला आहे. मात्र या प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारावरील १५ लाखांचा खर्चही आता पाण्यात गेला आहे.

भविष्यात निर्माण होणारी पाणी समस्या लक्षात घेऊन महापालिकेने लोकप्रतिनिधीचा विरोध डावलून अडीच वर्षापूर्वी खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करुन त्यापासून पिण्याचे तयार करण्याचा प्रस्ताव मंजुर केला होता. विशेष म्हणजे हा प्रस्ताव त्यावेळेस सत्ताधारी शिवसेनेने गोंधळात मंजुर करुन घेतला होता. परंतु आता दोन वर्षानंतर हा प्रकल्प अतिशय खर्चीक असल्याचे शहाणपण उशिराने का होईना सत्ताधारी शिवसेनेला झाले आहे. त्यामुळे या संदर्भातील आलेला प्रस्ताव शुक्रवारी कोणतीही चर्चा न करता रद्द करण्यात आला. या संपूर्ण प्रकल्पाला आधी पासूनच विरोधकांचा विरोध होता. तसेच स्थानिक नागरीकांचा देखील विरोध होता. परंतु हा विरोध डावलून तब्बल १५० कोटींचा अवास्तव खर्च असलेला हा प्रकल्प प्रशासनाने मंजुर करुन घेतला होता.

या विरोधात राष्ट्रवादीने न्यायालयात देखील धाव घेतली होती. दरम्यान आता कोरोनामुळे पालिकेच्या तिजोरीवर परिणाम झाला असल्याचे कारण सांगत आणि हा प्रकल्प महागडा ठरणार असल्याने तो रद्द करण्यात आल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.