
कल्याण : कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी न घेता सार्वजनिक ठिकाणी मास्क व रूमालाचा वापर न केल्याने कल्याण डोंबिवली क्षेत्रात नागरिकांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उचलत तब्बल १लाख ३५हजार ४५० रू.इतका
कल्याण : कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी न घेता सार्वजनिक ठिकाणी मास्क व रूमालाचा वापर न केल्याने कल्याण डोंबिवली क्षेत्रात नागरिकांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उचलत तब्बल १लाख ३५हजार ४५० रू.इतका दंड वसूल केला आहे.
कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहऱ्यावर मास्क, रूमाल परिधान न केल्यास ते नागरिक ५०० रूपये दंडास पात्र असतील, असा आदेश यापूर्वीच महापालिकेने निर्गमित केला होता. महापालिका क्षेत्रात सदयस्थितीत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे व नागरिक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळुन आल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या व्यक्तींविरुध्द सर्व प्रभाग क्षेत्रात जोरदार मोहीम सुरु करण्यात आली आहे. अ प्रभागात मास्क परिधान न करणाऱ्या लोकांकडून रू.७०००/-, ब प्रभागात रू.६७५००/-, क प्रभागात रु.१९९५०, ड प्रभागात रु.१४५००, जे प्रभागात रु.८०००/-, फ प्रभागात रु.१८०००/-, आणि आय प्रभागात रु.५००/-, असा एकुण रु.१,३५,४५० रुपये इतका दंड गेल्या दोन दिवसात संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी तेथील स्थानिक पोलीस स्टेशनच्या सहकार्याने वसूल केला आहे. यापुढेही मोहीम अशीच पुढे चालू ठेवण्याबाबत निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत.