कल्यााण डोंबिवलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आणि मास्क न लावल्यास दंड

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी थूकल्यास थुंकणाऱ्या व्यक्तिकडून २००० रुपये दंड आकारला जाणार आहे. दंड न भरल्यास फौजदारी करवाई करण्यात येईल, असे परिपत्रक पालिका

 कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी थूकल्यास थुंकणाऱ्या व्यक्तिकडून २००० रुपये दंड आकारला जाणार आहे. दंड न भरल्यास फौजदारी करवाई करण्यात येईल, असे परिपत्रक पालिका आयुक्तांनी काढले आहे. त्याचबरोबर घराबाहेर निघताना चेहऱ्यावर मास्क लावणे आवश्यक आहे अन्यथा ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी महानगरपालिका विविध प्रकारच्‍या उपाययोजना करीत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्‍यामुळे कोविड-१९ या आजाराचा प्रसार होत असल्‍याचे आढळून आल्‍यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्‍यासाठी सार्वजनिक जागी थुंकण्‍यावर प्रतिबंध करणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे संपूर्ण महापालिका क्षेत्रात सार्वजनिक जागी थूंकणाऱ्या व्यक्तीकडून २००० रुपये दंड आकारण्यात येईल. या दंडाची रक्‍कम न भरल्‍यास, भारतीय दंड संहितेच्‍या १८८ अन्‍वये फौजदारी कारवाई करण्‍यात येईल. तसेच  नागरीकांनी आणि महापालिका क्षेत्रात विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना चेहऱ्यावर मास्क/रुमाल/कापड परिधान करावे अन्यथा ५००/- रुपये दंड आकारण्यात येईल. दंड न भरल्यास संबंधित व्यक्ति विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.