सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी प्रशासनाने सोसायटी व वाहनचालकावर उगारला कारवाईचा बडगा

कल्याण : सोसयटीने एका प्रभागातील कचरा दुसऱ्या प्रभागात वाहनातून नेऊन टाकल्या प्रकरणी सोसयटीकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचराविभागाने ५०००रु. दंडात्मक रक्कम वसुल केली. तसेच वाहन

 कल्याण : सोसायटीने एका प्रभागातील कचरा दुसऱ्या प्रभागात वाहनातून नेऊन टाकल्या प्रकरणी सोसयटीकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने ५०००रु. दंडात्मक रक्कम वसुल केली. तसेच वाहन चालकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करून गुन्हा दाखल करीत वाहन चालकांस २०००रू. दंड भरण्यास भाग पाडल्याची घटना आज दुपारी घडली.               

महानगरपालिकेने शुन्य कचरा मोहीम सुरु केली असुन उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा सुरु केली असल्याने कल्याण डोंबिवली लवकरच कचराकुंडी मुक्त, कचरा मुक्त शहर दिसेल असे चित्र दिसत आहे. दरम्यान ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील शहाड परिसरातील केम्प्स् कॉर्नर को. ऑप हौसिंग सोसायटीने ओला व कचरा सुका कचरा विलगीकरण न करिता वाहनाने आज दुपारी इंदिरा नगर शौचालयाजवळ सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने ‘अ’ प्रभागाचे आरोग्य निरिक्षक व पथकाने धडक कारवाईचा बडगा उगारला. घनकचरा अंमलबजावणी कायद्याअंतर्गत ५००० रू. दंडात्मक रक्कम सोसयटीकडुन वसुल करण्यात आली. तसेच  ‘अ’  व ‘ब’ प्रभाग आरोग्य निरिक्षक यांनी संयुक्तरित्या  धडक  कारवाई  करीत  ज्या वाहनातून कचरा टाकला गेला होता त्या वाहन चालका विरोधात  ‘ब’  प्रभागाचे आरोग्य निरिक्षक बाळासाहेब कंद  यांनी दुसऱ्या प्रभागातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून वाहनचालकाला बोलावून घेत चालकालासुद्धा पोलीस स्टेशनमध्ये  २००० रू. दंड भरण्यास  भाग पडले.