mask

डोंबिवली : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सदर साथीचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या तसेच महापालिका क्षेत्रात विविध‍ आस्थापनांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी/नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क/कापड/ रुमाल परिधान करणे महापालिकेने यापूर्वीच बंधनकारक(mask compulsory) केले आहे आणि जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क परिधान करणार नाहीत त्यांचेविरुध्द पोलिसांच्या मदतीने दंडनीय कारवाई करणेबाबत सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत, असे असतानाही अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क परिधान करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आत्ता  मोहिम अधिक तीव्र करण्याच्या अनुषंगाने आज सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रभागक्षेत्रात पाहणी करून मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांना समज देऊन त्यांच्यावर दंडनीय कारवाई केली आहे.

महापालिकेच्या ब प्रभाग क्षेत्रातील ५३ नागरिकांकडून रु.२६,५००, क प्रभाग क्षेत्रातील ७१ नागरिकांकडून रु.३५,५००, जे प्रभाग क्षेत्रातील ६६ नागरिकांकडून रु.३३०००,ड प्रभाग क्षेत्रातील ४२ नागरिकांकडून रु.२१००००, फ प्रभाग क्षेत्रातील ७४ नागरिकांकडून रु.३७,०००, तर ह प्रभाग क्षेत्रातील ८१ नागरिकांकडून रु.४० ,५००, आय प्रभाग क्षेत्रातील  नागरिकांकडून रु.६०००, इ प्रभाग क्षेत्रातील १५ नागरिकांकडून रु.७२०० अशी एकूण रक्कम रुपये २,०६,७०० एवढी रक्कम दंड स्वरूपात मास्क न परिधान करणाऱ्या नागरिकांकडून आज वसूल करण्यात आली आहे. कोरोना साथीला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने ही मोहीम अशीच सुरू ठेवणेबाबतचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.