कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला आग

कल्याण : - आधारवाडी परिसरातील डम्पिंग ग्राउंडला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. खाडी किनारी असलेल्या डोंगरा एवढ्या असणाऱ्या डम्पिंग

कल्याण : – आधारवाडी परिसरातील डम्पिंग ग्राउंडला शनिवारी दुपारी  १ वाजताच्या सुमारास  आग लागल्याची घटना घडली आहे. खाडी किनारी असलेल्या  डोंगरा एवढ्या असणाऱ्या डम्पिंग  ग्राऊंडवर  कचरार्याच्या ढिगाऱ्याला ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्यांनी घटनास्थळी पोहचत आणि  २ टँकरच्या साहय्याने  ही आग आटोक्यात आणली. या आगीमुळे डम्पिंग आणि आजूबाजूच्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. 

या धुरामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. या आगीच्या घटना नेहमीच घडत असून, डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे शासनाचे निर्देश असतांना देखील पालिका प्रशासन  हे डम्पिंग  बंद करण्यात अपयशी ठरले आहेत. सहाय्यक आयुक्त घनकचरा व्यवस्थापन गणेश बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता उन्हाळा सुरू असल्याने कचार्याच्या ढीगाखाली खोलवर मिथेन वायु तयार होतो व त्यामुळे आग लागली असावी  अग्निशमन दलाच्या ३ बंबाच्या व २ टँकरच्या साहय्याने आगीवर नियंत्रण मिळवले असल्याचे सांगितले.