ठाण्यातील रेल्वे स्टेशनजवळील ४ दुकानांना भीषण आग, मार्केटमधील दुकानं जळून खाक

ठाणे स्थानकाजवळील प्रभात टॉकीज या परिसरात असलेल्या चार दुकानांना आग लागली आहे. या आगीमुळे इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील दुकानं जळून खाक झाली आहेत.

    ठाणे : ठाणे स्थानकाजवळील चार दुकानांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळच्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे स्थानकाजवळील प्रभात टॉकीज या परिसरात असलेल्या चार दुकानांना आग लागली आहे. या आगीमुळे इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील दुकानं जळून खाक झाली आहेत.

    या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली असता, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अजूनही अस्पष्टता आहे.