fire at dombivali

डोंबिवली स्टेशनजवळील लक्ष्मी निवास इमारतीला (Laxmi Nivas Building) आग लागली आहे.

    डोंबिवली: डोंबिवली पूर्व (Dombivli East) परिसरात एका इमारतीला भीषण आग (Major fire) लागली आहे. डोंबिवली स्टेशनजवळील लक्ष्मी निवास इमारतीला (Laxmi Nivas Building) ही आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले आहेत. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

    ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळालेली नाही. या इमारतीत गोडाऊन असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच आग लागल्याने इमारतीत काही नागरिक अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.

    ही इमारत स्टेशनजवळ असून इमारतीच्या समोर स्कायवॉक आहे. घटनास्थळावर नागरिकांनीही मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. स्टेशनजवळचा परिसर गजबजलेला आणि दाटीवाटीचा असल्याने अग्निशमन दलालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.