fire in bhivandi bank of maharashtra branch

भिवंडी :भिवंडी शहरातील अंजुरफाटा येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत रविवारी रात्री (fire in bank of maharashtra bhivandi branch) साडेदहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचा धूर बाहेर दिसू लागल्याने आगीची माहिती समाजल्यावर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली असता नारपोली पोलिसांनी अग्निशामक दलास पाचारण केले .

रात्रीची वेळ असल्याने व शटर बंद असल्याने शटर तोडून आत शिरलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग तात्काळ विझवली. बँकेच्या शाखेतील प्रिंटरने पेट घेतल्याने ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ आग विझविल्याने बँकेतील इतर साहित्य व स्ट्राँग रूम वाचविण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना व मोठी वित्तहानी टळली आहे.