dombivali fire

डोंबिवलीमध्ये दशरथ म्हात्रे कंपाऊंड भंगार गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान भीषण आग(fire in dombivali) लागली. आग लागल्यानंतर छोटे मोठे अनेक स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. संपूर्ण परिसर धुरमय झाल्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांची पळापळ सुरु झाली.

डोंबिवली : औद्योगिक विभागातील(Industrial area) सोनारपाडा शंकरनगर येधील दशरथ म्हात्रे कंपाऊंड भंगार गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान भीषण आग(fire in dombivali) लागली. आग लागल्यानंतर छोटे मोठे अनेक स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. संपूर्ण परिसर धुरमय झाल्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांची पळापळ सुरु झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा उशिरापर्यंत प्रयत्न सुरु होता. दरम्यान आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

सोनारपाडा येथील दशरथ म्हात्रे यांच्या गोडाऊनमध्ये जुन्या फ्रीज, वाशिंगमशीन तसेच प्लास्टिक भंगाराचा मोठा साठा होता. सदर गोडाऊनमध्ये १० कामगार काम करीत होते. बुधवारी दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. भंगार गोडाऊन मध्ये जुने फ्रीज आणि वाशिंगमशीन मधील कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे आगीचा भडका उडाला. भंगारात जुन्या प्लास्टिकमुळे आग पसरत गेली. धुराचे मोठे लोट उठल्याने परिसर धुरमय झाला होता. आगीची माहिती मिळताच मानपाडा पोलीस पथक तसेच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथील अग्निशमन अधिकारी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न उशिरापर्यंत सुरु होता.

आगीची माहिती मिळताच कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. भाजपा नगरसेविका डॉ. सुनिता पाटील, पूर्व अध्यक्ष नंदकुमार जोशी, मनीषा राणे आदी उपस्थित होते. दोन तासानंतरही आग पुन्हा भडल्याने तुळजा भवानी वॉटर सप्लायरकडून पाण्याचे टँकर मागविण्यात आले.