मच्छिमार युवकांसाठी सातपाटी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये १ जुलैपासून प्रशिक्षण वर्ग

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये सागरी मत्स्यव्यवसाशी संबंधित नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालनाचे प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रात देण्यात येणाऱ्या

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये सागरी मत्स्यव्यवसाशी संबंधित नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालनाचे प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रात देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिन्यांचा असून असून आता पुढील प्रशिक्षण वर्ग १ जुलै ते ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी २२ विद्यार्थी घेण्यात येणार आहेत.दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांकडून प्रति महिना १०० रुपये तर दारिद्रय रेषेवरील विद्यार्थ्यांकडून प्रति महिना ४५० रुपये फी आकारण्यात येणार आहे.