भिवंडीतील भीषण आगीत पाच गोदामे जळून खाक 

भिवंडी: भिवंडी(bhivandi) तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कार्पोरेशन या गोदाम संकुलातील  गोदामांना दुपारच्या सुमारास भीषण आग(fire) लागण्याची घटना घडली .इंडियन कॉर्पोरेशन गोदाम संकुलातील इमारत क्रमांक २२९ मधील गोदाम क्रमांक ७ येथे सर्वप्रथम आग लागली व पाहता पाहता ही आग पसरत या आगीत तब्बल ५ गोदामांमध्ये साठवून ठेवलेले प्लास्टिक साहित्य ,रंगीत कागदी पॅकिंग यंत्र व कच्चा माल व नजीकच्या गोदमतील फरसाण बनविण्याच्या कारखान्यात ही आग पसरून येथील सर्व साहित्य जाळून खाक झाले आहे .

घटनेची माहिती कळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी खाजगी टँकरच्या मदतीने ही आग दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आटोक्यात आणली असून आग अजूनही धुमसत असून ही आग एवढी भयानक होती की या सर्व गोदामांचे पत्र्याचे छत लोखंडी अंगासह कोसळले होते.  या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.