मुरबाडमध्ये ५ वर्षीय मुलगी बेपत्ता

मुरबाड: मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील रिया तिवारी ही पाच वर्षीय मुलगी रविवार दुपारपासून बेपत्ता झाली आहे. रिया रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या नंतर घरी न आल्याने तिची शोधाशोध सुरू झाली व

 मुरबाड: मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील रिया तिवारी ही पाच वर्षीय मुलगी रविवार दुपारपासून बेपत्ता झाली आहे. रिया रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या नंतर घरी न आल्याने तिची शोधाशोध सुरू झाली व पोलिसांना कळविण्यात आले. संध्याकाळनंतर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्यासह पोलीस पथक, परिसरातील नागरिक, मुरबाड नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी रात्रभर रियाचा शोध घेतला.हे शोधकार्य सोमवारीही दिवसभर सुरू आहे. मात्र अद्यापही रियाचा तपास लागला नाही. रिया आसपासच्या परिसरात कुठे आढळून आल्यास रिन्टू तिवारी यांना ९३०९९७५१८६ या क्रमांकावर किंवा ९७६५२३१४८२ या क्रमांकावर राकेश तिवारी यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुरबाड पोलिसांच्या ०२५२४२२२२३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुरबाड पोलिसांनी केले आहे.