ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पुढील काळात प्रत्येकाने सामाजिक सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणं, सॅनिटायझरचा वापर या चतुःसूत्रीचा दैनंदिन जीवनात अंगीकार केला. तर आपण कोरोनावर मात करू शकतो असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

ठाणे : भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापन दिन समारंभ आज ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात पार पडला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पुढील काळात प्रत्येकाने सामाजिक सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणं, सॅनिटायझरचा वापर या चतुःसूत्रीचा दैनंदिन जीवनात अंगीकार केला. तर आपण कोरोनावर मात करू शकतो असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी या कार्यक्रमास अनेक नेते मंडळी सुद्धा सहभागी झाले होते. 

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी यंदा जिल्हा वार्षिक निधीतून आतापर्यंत सुमारे २२ कोटी रुपयांचा निधी जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच महापालिकांना देण्यात आला आहे. तसेच कोरोनाची तपासणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी लॅब्जना परवानगी देण्यात आली. असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ग्लोबल हॉस्पिटल तसेच नवी मुंबईत वाशी येथे सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये सिडकोच्या माध्यमातून १२०० बेड्सचं रुग्णालय उभं राहिलं.नव्या रुग्णसंख्येचा आलेख सातत्याने खाली येतोय. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचा दर वाढतोय आणि मृत्यूदर कमी करण्यात आपण यश मिळवतोय.