जिल्हाधिकारी कार्यालयात होणार ध्वजारोहण, जिल्ह्यात इतर ठिकाणी ध्वजारोहण न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

वाडा - महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हास्तरीय मुख्य ध्वजारोहण १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून

वाडा –  महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हास्तरीय मुख्य ध्वजारोहण १ मे  रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हयातील इतर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ध्वजारोहण आयोजित करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे रोजी सकाळी आयोजित केलेल्या  मुख्य ध्वजारोहण सोहळ्यास पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक  यांच्याशिवाय इतर कोणीही उपस्थित राहू नये असे शासनाचे आदेश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.