water in kalyan

कल्याण खाडीला आलेल्या भरतीच्या पाण्याने सखल भागात पूरजन्य(Flood Situation In Kalyan Dombivali) परिस्थिती निर्माण झाली. यामुळे नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. यामुळे हाहाकार माजला असून अनेक कुटंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

  कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan Dombivali) मनपा क्षेत्रात बुधवारच्या पावसाने कल्याण खाडीला आलेल्या भरतीच्या पाण्याने सखल भागात पूरजन्य(Flood Situation In Kalyan Dombivali) परिस्थिती निर्माण झाली. यामुळे नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. यामुळे हाहाकार माजला असून अनेक कुटंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

  कालपासून महापालिका क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून आज सकाळपर्यंत गेल्या 24 ‍तासात कल्याण परिसरात 142.5 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पडणा-या पावसामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक भागात मोठया प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले.

  या अतिवृष्टीत महापालिकेच्या यंत्रणेने सातत्याने काम करुन पुराच्या पाण्यात अडकलेल्या गरीब वस्तीतील नागरिकांना स्थलांतरीत करुन त्यांच्या नास्ता व जेवणाची व्यवस्था केली. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने अतिवृष्टीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या बाधित झालेल्या साडे सातशे नागरिकांना स्थलांतरीत केले तर १२० नागरिकांना रेस्क्यू केले. पालिका क्षेत्रातील सुमारे पाच हजार नागरिकांना जेवण वाटप केले तर तीनशे लोकांना नाश्ताची सुविधा उपलब्ध केली.

  कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रात मोठा खाडी किनारा असुन उल्हास, काळु, वालधुनी या नद्या या कल्याण खाडीला येऊन उल्हास खोर्यातील पावसाचे पाणी कल्याण खाडीला येऊन मिळते. सतत तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या नाले दुथडी भरुन वाहू लागले. कल्याण डोंबिवली परिसरातील सखल भागातील रस्ते , सखल भागातील वस्त्या पुराचे पाणी घुसले. कल्याण पश्चिमेतील, गोविंद वाडी, रेतीबंदर परिसरात रात्रीच्या सुमारास पुराचे पाणी शिरल्याने तब्येल्यातील १००० हुन अधिक म्हशींना स्थालंतरित करण्यात आले. ऊर्बेड, सापार्डे परिसरात देखील सखल भागात पुराचे पाणी शिरले. बारावे रिंगरुट लगत असणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात पाणी शिरल्याने प्रकल्पाचे नुकसान झाले आहे.

  कल्याणमधील दुर्गाडी परिसरात खाडीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाडेघर दिशेचा रस्ता बंद झाला होता. योगीधाम, शहाड ब्रिज परिसर देखील पाण्याखाली गेला होता. कल्याण पूर्वेतील जाईबाई विदयालय, सुर्या शाळा, माधव अर्पाटमेंन्ट, महालक्ष्मी कॉम्पलेक्स, कैलास नगर, ब प्रभाग क्षेत्रातही महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे शाळा, टावरी पाडा, घोलप नगर, समाज मंदिर या ठिकाणी पाणी शिरले होते. फ प्रभागक्षेत्रातही कांचनगांव, दिनेश नगर येथील चाळीत पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांना आर.बी.टी. विदयालय येथे स्थलांतरीत करण्यात आले.

  महापालिकेच्या ग प्रभाग क्षेत्रात साई प्रसाद, गणेश प्रसाद चाळीमध्ये पावसाचे पाणी भरल्यामुळे 71 नागरिकांना महापालिकेच्या लाल बहाद्दुर शाळेत स्थलांतरीत करण्यात आले. ह प्रभागात देवीचा पाडा, वेताळ नगर मधील चाळीत पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले. महापालिकेच्या जे प्रभागात शिवाजी नगर वालधूनी व बुध्द विहार अशोक नगर वालधूनी येथे पाणी साचल्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या सावरकर शाळेत स्थलांतरीत करण्यात आले. महापालिकेच्या आय प्रभागात आडीवली पिसवली या परिसरातील सखल भागात पाणी साचले होते. अ प्रभागातील शहाड, बंदरपाडा, अटाळी, बल्याणी, मांडा- टिटवाळा परिसरात पाणी साचले होते.