फोर्स जीप चालकाची बस व स्कोडा कारला धडक

भिवंडी: फोर्स जिप चालकाने त्याच्या ताब्यातील कार निष्काळजीपणे, हयगयीने व भरधाव वेगात चालवून बस व स्कोडा कारला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे.या अपघातात बस चालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर

 भिवंडी: फोर्स जिप चालकाने त्याच्या ताब्यातील कार निष्काळजीपणे, हयगयीने व भरधाव वेगात चालवून बस व स्कोडा कारला धडक दिल्याने  भीषण अपघात घडला आहे.या अपघातात बस चालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून स्कोडा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे.या अपघाताप्रकरणी कारचालकविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फोर्स कंपनीची टॅक्स मॉडेलची जिप.नं एमएच-२८/ए झेड ३३५० वरील चालकाने त्याच्या ताब्यातील जिप भिवंडीहून रांजणोली नाक्याच्या दिशेने घेऊन जात असताना त्याने निष्काळजीपणे, हयगयीने व भरधाव वेगात चालवून रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून प्रथम बस नं.एमएच-०४-जेके-०८८१ वरील ड्रायव्हर महेंद्र साळुंके यास पाठीमागून जोरदार ठोकर दिली या अपघात महेंद्रचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत त्यानंतर हरिष उत्तम पाटील याच्या ताब्यातील स्कोडा कार नं. एम.एच-४७-सी-९३५९ हिस पाठीमागून जोरदार धडक देवून कारचे नुकसान केले आहे तसेच जखमी ड्रायव्हर महेंद्र साळुंके यास वैद्यकीय मदत न देता जिप चालक पळून गेला आहे.पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या अपघाताच्या घटनेचा पुढील तपास शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर.ए.पाखरे करीत आहेत.