माजी आमदार व ठाण्याचे माजी महापौर अनंत तरेंचे निधन

अनंत तरे २००८ पासून शिवसेनेचे उपनेते होते तसेच २०१५ पासून ते पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. कोळी समाजातून आलेल्या अनंतर तरे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेसाठी योगदान दिले. आनंद दिघे यांच्या कार्यामुळे शिवसेनेचे ठाण्यातील महत्त्व प्रचंड वाढले. या वास्तवाचे भान ठेवून शिवसेनेचे नागरिकांच्या मनातील स्थान कायम राखण्यासाठी अनंत तरे यांनी काम केले.

    ठाणे: शिवसेनेचे माजी आमदार आणि ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे (६७) यांचे निधन झाले. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु आज सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन नातवंडे भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    अनंत तरे २००८ पासून शिवसेनेचे उपनेते होते तसेच २०१५ पासून ते पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. कोळी समाजातून आलेल्या अनंतर तरे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेसाठी योगदान दिले. आनंद दिघे यांच्या कार्यामुळे शिवसेनेचे ठाण्यातील महत्त्व प्रचंड वाढले. या वास्तवाचे भान ठेवून शिवसेनेचे नागरिकांच्या मनातील स्थान कायम राखण्यासाठी अनंत तरे यांनी काम केले.

    ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत १९९२ रोजी अनंत तरे हे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून राबोडीतून निवडून आले होते. त्यांनी ३१ मार्च ९३ साली प्रथम ठाणे महापालिकेचं महापौरपद भूषवलं. त्यावेळी ११ अपक्ष नगरसेवक निवडून आल्याने सर्वदुष्टी कोणातून प्रबळ असणाऱ्या व्यक्तीला महापौर पदाची उमेदवारी देणे गरजेचं असल्याने शिवसेनेतून अनंत तरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर ९४ आणि ९५ साली असे सलग तीनवेळा त्यांनी महापौरपद भूषवलं. ठाणे महापालिका महापौरपदाची हॅट्रिक साधणारे एकमेव व्यक्ती त्यावेळी एक वर्षाची मुदत होती .