parambeer singh

परमबीर सिंग आणि खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांविरोधात क्रिकेट बुकी जलानने लेखी तक्रार दाखल केली आहे. एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन सिंग व त्यांच्या टीमने करोडो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे या तक्रारीत त्याने म्हटले आहे.

    ठाणे –  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा खंडणी विरोधाचा गुन्हा सिंगवर दाखल करण्यात आला आहे. तसेच क्रिकेट बुकीकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्यासह काही अधिकाऱ्यांविरूद्ध एक क्रिकेट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांच्याकडून खंडणी विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    क्रिकेट बुकी जलानने दाखल केली लेखी तक्रार

    परमबीर सिंग आणि खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांविरोधात क्रिकेट बुकी जलानने लेखी तक्रार दाखल केली आहे. एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन सिंग व त्यांच्या टीमने करोडो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे या तक्रारीत त्याने म्हटले आहे.

    ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप जालान यांनी केला.

    एवढेच नाही तर आपले मित्र केतन तन्ना यांच्याकडून देखील एक कोटी 25 लाख रुपये वसुली केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.  त्यामुळे ठाण्यात आता पर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून ही तिसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे.