Former Tribal Development Minister Vishnu Savara passes away

मुंबई : माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा (वय ७२ वर्षे) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मागील दोन वर्षांपासून ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

विद्यार्थी दशेपासून भाजपाचे कार्यकर्ते असणाऱ्या विष्णू सवरा यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. तर, आमदार म्हणून चार वेळा वाडा विधानसभा, एकदा भिवंडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तर, एक वेळा विक्रमगड मतदारसंघाचेही प्रतिनिधित्वही त्यांनी केले होते.

१९९५ च्या युती शासनाच्या काळात यांनी आदिवासी विकास मंत्री राज्यमंत्री म्हणून काम केले होते. तर, २०१४ च्या युती शासनाच्या काळात ५ वर्षे आदिवासी विकास मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती.

कॉमर्समधून पदवीधर असणाऱ्या सवरा यांनी सुरुवातीच्या काळात स्टेट बँकेत नोकरीही केली होती. अतिशय मितभाषी व साध्या स्वभावाचे असणाऱ्या विष्णू सवरा यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.