सुदैवानं धोका टळला ; लोकांनी घेतला सुटकेचा श्वास !

पालघर : निसर्ग चक्रीवादळाचा फटका ३ जून ला पालघर जिल्ह्याला देखील बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. त्यामुळे पालघर जिल्हा प्रशासनकडून जीवितहानी होवू नये म्हणून सर्व ती

पालघर : निसर्ग चक्रीवादळाचा फटका ३ जून ला पालघर जिल्ह्याला देखील बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. त्यामुळे पालघर जिल्हा प्रशासनकडून जीवितहानी होवू नये म्हणून सर्व ती तयारी करण्यात आली होती. मात्र एनवेळी एकाएक चक्रीवादळानं आपली दिशा बदलल्यानं सुदैवानं जिल्हा यातून बचावला. आणि लोकांनी जिल्हा प्रशासनानं सुटकेचा श्वास घेतला.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम २ जून पासून सर्व परिस्थिती हाताळन्यासाठी सज्ज होती. ते सर्व परिस्थिति वर लक्ष ठेवून होते. ते चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या सर्व गावागावांत जावून लोकाना खबरदारीच्या सर्व सुचना ही देत होते.  ह्या टीम सर्व मोर्चा सांभालुन होत्या. आणि बुधवारी चक्रीवादळानं आपली दिशा बदलल्यानं त्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

या चक्रीवादळाचा फटका पालघर जिल्ह्यातल्या वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या ४ तालुक्यातल्या समुद्र काठालगत वसलेल्या जवळपास २२ गावांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे पालघर आणि डहाणू तालुक्यात पुण्याहुन प्रत्येकी १एनडीआरएफ च्या टीम ला तर वसई तालुक्यात एसडीआरएफच्या २ टीमना तैनात करण्यात आलं होतं. 

खबरदारीचा उपाय म्हणून ३ जूनला पालघर , वसई, डहाणू  आणि तलासरी या ४ तालुक्यातली अत्यावश्यक सेवा आणि दुकानं वगळता पालघर जिल्हयातल्या समुद्रकिनारी असलेल्या वसई, पालघर, डहाणू तालुक्यातले सर्व उद्योग, उद्योग आस्थापना, सर्व दुकानं, खाजगी आस्थापना आदी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिले होते. 

चक्रीवादळा मुळे बाधित होण्याची शक्यता असलेल्या पालघर, डहाणू, वसई आणि तलासरी या ४ तालुक्यातल्या २२ गावां मधल्या सखल भागात आणि कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या जवळपास १५ हजार  लोकांना सुरक्षित ठिकाणी निवारा छावण्यांमध्ये स्थलांतरीत करण्यात आलं आहे. आणि या छावण्यां मध्ये पिण्याचं पाणी , अन्न , स्वच्छता आणि आरोग्य सेवा तसचं औषधांचा योग्य पुरवठा करण्याची जबाबदारी ही जिल्ह्यातल्या सर्व गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.

दुपारच्या दरम्यान हे निसर्ग चक्रीवादळ पालघर जिल्हयात धडकण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे सर्वांच्या मनात धास्ती होती. की चक्रीवादळ आलं तर काय होइल. मात्र पालघर जिल्ह्यात बुधवारी चक्रीवादळाचा तसा काही परिणाम जाणवला नाही. जिल्ह्यातल्या पालघर, सातपाटी, डहाणू, चिखले आणि इतर भागांत सध्या समुद्र किनारे आणि आसपासचं वातावरण शांत दिसलं. आणि  दिवसभर पाऊस ही रिमझिम स्वरूपाचा बरसत होता. संध्याकाळ पर्यंत चक्रीवादळानं आपली दिशा बदलली. आणि चक्रीवादळानं दिशा बदलली तसं आता आपल्या जिल्ह्यावरच संकट ही टळलं हे पाहताच, एकताच जिल्ह्यातल्या सर्व लोकांनी आणि प्रशासनानं आनंदून एकच सुटकेचा श्वास घेतला.