
मुरबाड : मुरबाडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या आजाराने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे.सध्या कोरोनाचे ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात तहसीलदार कार्यालय सब जेलमध्ये अटक असलेल्या चार
मुरबाड : मुरबाडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या आजाराने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे.सध्या कोरोनाचे ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात तहसीलदार कार्यालय सब जेलमध्ये अटक असलेल्या चार आरोपींचा समावेश असल्याने मुरबाड तहसीलदार कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.
मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील असंख्य नागरिकांची कोरोनाबाधित क्षेत्रात नोकरीच्या निमित्ताने दररोज ये जा सुरू आहे, याबाबतीत कोणतीही काळजी आणि खबरदारी घेतली जात नसल्याने मुरबाड तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे.शनिवारी एकाच दिवशी ९ रुग्ण आढळले होते .त्यानंतर रविवारी पाच रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये मुरबाड तहसीलदार कार्यालयातील सब जेलमध्ये अटक असलेल्या चार आरोपींचा समावेश आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुरबाड तहसीलदार कार्यालय पुढील दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मुरबाड तहसीलदारांनी घेतला आहे. तर तालुक्यातील सर्व छोट्या मोठ्या बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.