एटीएममधून ४९ लाख चोरणारे तिघे अटकेत

कल्याण : कल्याण स्टेशन परिसरातील एका बँकेच्या एटीएममधून ४९ लाखांची रोकड लंपास केल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्थानकातील पोलिसांना यश आले आहे. बँकेच्या एटीएममध्ये

कल्याण : कल्याण स्टेशन परिसरातील एका बँकेच्या एटीएममधून ४९ लाखांची रोकड लंपास केल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्थानकातील पोलिसांना यश आले आहे. बँकेच्या एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना एटीएमचा पासवर्ड वापरून ही चोरी करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशनबाहेर असलेल्या आयडीबीआय बँकेच्या एटीममध्ये एटीएम मशीनचा पासवर्ड वापरून ४९ लाख रुपये चोरल्याची तक्रार शुक्रवारी रायटर सेफगार्ड प्रा.लि.कंपनीचे ब्रँच हेड राहुल बांदेकर यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात दिली होती. यावेळी त्यांनी एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करत किरण पंडित या मुख्य सूत्रधारासह जयदीप पवार आणि जुगलकिशोर मिश्रा या त्याच्या साथीदारांनादेखील अटक करत त्यांच्याकडून ३९,८५,०००/- रुपये रोख रक्कम, १ होंडा अॅक्टीवा मोटार सायकल, १ सुझुकी इंट्रोडर मोटार सायकल, १ ऑटो रिक्षा, ४ मोबाईल फोन असा एकूण ४२,७९,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली.