रेल्वेत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार दरोडेखोरांना अटक ; एक फरार

काही दरोडेखोर मेल एक्स्प्रेस मध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलयाची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे काल रात्रीच्या सुमारास कल्याण रेल्वे पोलीसानी कल्याणहून कुशीनगरकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये सापळा रचला. पाच जनावर संशय आल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारी हत्यारे आढळली. पोलिसांनी तत्काळ झडप घालत चार जणांना अटक केली आहे. तर त्यांचा साथीदार मात्र निसटण्यात यशस्वी झाला.

    कल्याण : सहा दिवसांपूर्वी जेल मधून जामीनावर सुटका झालेले सराईत गुन्हेगार पुन्हा एकदा मेल एक्स्प्रेस मध्ये दरोड्याचा तयारीत होते. मात्र कल्याण रेल्वे पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला आहे. कल्याण रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार सराईत गुन्हेगार पुन्हा एकदा गजाआड झाले तर त्यांचा एक साथीदार निसटण्यास यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    काही दरोडेखोर मेल एक्स्प्रेस मध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलयाची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे काल रात्रीच्या सुमारास कल्याण रेल्वे पोलीसानी कल्याणहून कुशीनगरकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये सापळा रचला. पाच जनावर संशय आल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारी हत्यारे आढळली. पोलिसांनी तत्काळ झडप घालत चार जणांना अटक केली आहे. तर त्यांचा साथीदार मात्र निसटण्यात यशस्वी झाला.

    त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारी हत्यारे हस्तगत केली आहेत. प्रकाश सेवक, शंकर शाह, धनंजय ओमप्रकाश शुक्ला, रईस रशीद शेख अशी अटक केलेल्या दरोडेखोराची नावे असून इमरान उमर खान हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    हे सर्व आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून १० दिवसांपूर्वी विविध गुन्ह्यात या पाच ही जणांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. सहा दिवसांपूर्वी ते जामिनावर सुटले. यानंतर पुन्हा या आरोपीनी रेल्वे प्रवाशांना लुटण्याचा आखलेला कट पोलिसांनी उधळून लावत पुन्हा त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.