कल्याण डोंबिवलीत कोरोनाने ओलांडला ४ हजारांचा आकडा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने ४ हजारांचा आकडा पार केला असून गेल्या २४ तासांत २२६ नवे रुग्ण आढळले असून ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या या २२६

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने ४ हजारांचा आकडा पार केला असून गेल्या २४ तासांत २२६ नवे रुग्ण आढळले असून ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या या २२६ रुग्णामुळे कोरोना रुग्णांची संख्या ४१९२ झाली आहे. या ४१९२ रुग्णांमध्ये २४१९ रूग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून १६८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ८५ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.