Fraud

कल्याणमधील(Kalyan) आमदाराच्या मुलाला तब्बल ३९ लाख २० हजारांना गंडा(Fraud) घालण्यात आला आहे.

    कल्याण : कल्याण(kalyan) पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाला तब्बल ३९ लाख २० हजारांना गंडा(Fraud) घालण्यात आला आहे. ईआरपी सॉफ्टवेअर डेव्हलप (ERP Software Development) करण्याचे सांगून फसवणूक करण्यात आली आहे.

    याबाबत आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा प्रणव याच्या फिर्यादीवरून आशिषकुमार चौधरी या इसमाविरोधात कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये (Kolsewadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादी प्रणव याच्या मायक्रोनेट इंटरप्रायजेस या फर्ममध्ये आरोपी आशिषकुमार चौधरी हा सॉप्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी करीत असताना ईआरपी सॉप्टवेअर शिक्षणाकरिता डेव्हलप करुन त्याव्दारे अधिक फायदा होईल, असा त्यांचा विश्वास संपादन करून त्याने डॉ. डी वाय पाटील शिक्षण संस्था व जळगाव विदयापीठ यांना सॉप्टवेअर विकत असल्याबाबत बनावट ई मेल करून तसेच जळगाव विदयापीठा बरोबर बनावट ॲग्रीमेंट तयार करुन प्रणव यांच्या फर्मकडे सादर केले.

    आरोपीने ऑक्टोबर २०१८ ते ऑक्टोंबर २०२० या काळात प्रणव यांच्या फर्मकडुन ईआरपी सॉप्टवेअर तयार करण्याच्या उददेशाने फिर्यादीच्या बँक खात्यातून आरोपीच्या खात्यावर ३९ लाख २० हजार रुपये इतकी रक्कम आरटीजीएस व्दारा वेळोवेळी जमा केली असुन रक्कम घेवुन आरोपी आशिषने फिर्यादी प्रणव गायकवाड यांच्या फर्मची फसवणूक केली म्हणुन कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक एस. एस. कुंभार हे अधिक तपास करीत आहेत.