kalyan fraud

कल्याण : बकरी पालनाच्या व्यवसायात पैसे दुप्पट करून देतो याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या अद्यापही फरार आहे.(fraud of 40 lakhs by saying making double money in goat business)

कल्याण : बकरी पालनाच्या व्यवसायात पैसे दुप्पट करून देतो याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या अद्यापही फरार आहे.(fraud of 40 lakhs by saying making double money in goat business)

कल्याण पश्चिमेतील भानुसागर टॉकीजजवळ हीना अपार्टमेंटमध्ये अनमोल साई ॲग्रो गोट नावाची एजन्सी होती. कमलकांत यादव व त्याचे साथीदार माधुरी देशमुख, राजेश गुप्ता, पवन दुबे हे चौघे बकरी पालनचा व्यवसाय करत होते. मुरबाड येथे गोट फार्म असुन त्यामध्ये ५० बकऱ्या असल्याबाबत लोकांना या स्कीममध्ये पैसे गुंतवणूक केल्यास एका वर्षात दुप्पट रक्कम करून देतो असे आश्वासन देत त्यांच्याकडून चेकने तसेच ऑनलाईन व रोखीने पैसे स्वीकारत होते. आतापर्यंत यांनी अनेक लोकांकडून जवळपास ४० लाख रुपये घेतले आहेत.  कंपनीचा मालक कमलाकांत यादव पळून गेला. काही लोकांना पैसे मिळाले नाही म्हणून लोकांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले यांनी तपास सुरु करत लोकांना गंडा लावणाऱ्या घाटकोपर येथील पवन दुबे याला हैद्राबाद येथील हयात नगर येथून तर राजेश गुप्ता याला ओटी सेक्शन उल्हासनगर येथून अटक केली आहे. तर यांचा म्होरक्या कमलेश यादव आणि साथीदार माधुरी देशमुख हे अद्याप फरार आहेत.

या अटक आरोपींकडून पोलिसांनी ६ लाख ४० हजार ८०० रुपये रोख रक्कम, एक लेनोवा कंपनीचा लॅपटॉप, पॅनॉसॉनिक कंपनीचा ए सी युनिट, एक लाकडी टेबल, ४ खुर्चा असा एकुण ७ लाख ८०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  निरीक्षक (गुन्हे) संभाजी जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले इत्यादींनी पार पाडली.