आमदार चौघुले आणि नगरसेवक निलेश चौधरी यांनी ४० कामगारांसाठी भिवंडी ते वाराणसीपर्यंत बसची केली सोय

भिवंडी: कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद होते. यात सर्वाधिक प्रभावित झाले ते या उद्योग व्यवसायात मजुरी रोजंदारी वर काम करणारे परप्रांतीय स्थलांतरीत

 भिवंडी: कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद होते. यात सर्वाधिक प्रभावित झाले ते या उद्योग व्यवसायात मजुरी रोजंदारी वर काम करणारे परप्रांतीय स्थलांतरीत कामगार . त्यामुळे या परप्रांतीय कामगारांना काम नसल्याने त्यांना आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ लागली असताना सुरवातीच्या टप्प्यात अनधिकृत ट्रक कंटेनर मधून पैसे देऊन चोरीछुपे जाण्याचे प्रकार वाढू लागला. असे पुन्हा होऊ नये म्हणून भिवंडी येथील आमदार महेश चौघुले यांच्या मित फाऊंडेशनसह नगरसेवक निलेश चौधरी यांच्या धर्मराजा ग्रुपच्या माध्यमातून उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथील भिवंडी शहरात अडकून पडलेल्या ४० कामगारांना घरी जाण्यासाठी मोफत बस उपलब्ध करून देत त्यांना त्यांच्या गावी नुकतेच रवाना करण्यात आले.या प्रसंगी आमदार महेश चौघुले, नगरसेवक निलेश चौधरी, नितेश एनकर, मयूर चौधरी, दिनेश पाटील यांसह असंख्य नागरिक उपस्थित होते. या सर्वांनी टाळ्या वाजवून या प्रवाशांना निरोप दिला. या सर्व कामगारांना प्रवासा दरम्यान भोजन अल्पोपहार पिण्याचे पाणी सुद्धा आयोजकांकडून देण्यात आले