अंंकुर बाल विकास केंद्रातील निराधार विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

टिटवाळा : टिटवाळ्यातील अंकुर बालविकास केंद्रातील  निराधार ,गरीब विद्यार्थ्यांसाठी  मोफत आरोग्य तपासणी साई  होमिओपॅथी मेडिकल काँलेज आणि  नित्यानंद हॉस्पिटल दुगाड फाटा भिवंडी कल्याणातील पत्रकार यांच्या माध्यमातून करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  अंकुर बालविकास केन्द्रातील निराधार, गरजु बालकांना संचलिका  अक्षदा भोसले यांनी आधार देत जवळील गणेश विघालयात शालेय शिक्षणाची सोय करून शिक्षणाच्या प्रवाहात आण्याचे योगदान करीत आहेत.                 

अंकुर बाल विकास केन्द्रातील या लहानग्या विद्यार्थ्यांसाठी सामजिक बांधिलकीतून काही करता यावे म्हणुन कल्याणातील पत्रकार,दतात्रेय बाठे ,अशोक कांबळे, दिनु जाधव, दिपक मोरे,अतुल फडके, दिपक बागुल यांनी एकत्र येत अशोक कांबळे यांच्या पुढाकाराने साई होमिओपॅथी मेडिकल काँलेज आणि नित्यानंद हाँस्पाटिल दुगाड फाटा ,भिवंडी चे  डाँ. जे पी शुक्ला ( प्रोजेक्ट इनचार्ज), डाँ सुधीर म्हात्रे, भुपेंद्र सिंग (इनटेस्)  यांनी अंकुर बालविकास केन्द्रातील विघार्थ्यासाठी मोफत आरोग्य तपसणी करण्यात आली.यासाठी साई होमिओपॅथी मेडिकल काँलेजचे डॉ. जे पी शुक्ला   विघार्थ्या आभिषिका वाघचौरे, रौनक जेन, योगेश शुक्ला यांनी मेहनत घेतली याप्रसंगी खेळीमेळीच्या वातावरणात सोशल डिस्टन चे पालन करीत अंकुर बालविकास केन्द्रातील निराधार मुलांना माँक्स्, खाऊ, आर्सेनिक अँल्ब  गोळ्याचे  वाटपडॉक्टर यांच्या पथकाने  केले. ओमकार बाठे यांनी निराधार मुलांसाठी डेटॉल साबणाचे वाटप केले. तसेच पेरू व लिंबू रोपचे  रोपण डॉ. जे पी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये केन्द्रातील विघार्थ्यानी गाणी म्हटली व अगळा आनंद लुटला. या कार्यक्रमानिमित्त निराधार मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे चित्र दिसत होते