१०वी, १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची मोफत ऑनलाईन सुविधा

कल्याण : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात १०वी, १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची मोफत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.कोरोना संकट, वाढत जाणारा लॉकडाऊन, संचारबंदी व शाळा, कॉलेजही बंद

कल्याण : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात  १०वी, १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची मोफत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोरोना संकट, वाढत जाणारा लॉकडाऊन, संचारबंदी व शाळा, कॉलेजही बंद असल्यामुळे दहावी व बारावीचे विद्यार्थी सध्या घरातच आहेत. पण त्यांच्यावर निकालाचं, प्रवेशाचं, अभ्यासक्रमाचं, भवितव्याचं, व संधी हुकण्याचं प्रचंड दडपण आहे. अशा  परिस्थितीत काय करावे यासाठी त्यांच्या मनात संघर्ष व संभ्रम आहे. त्यांना योग्यवेळी योग्य त्या मार्गदर्शनाची व सल्ल्याची तीव्र गरज आहे. त्यासाठी शासनाने मदत करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात ४०३ प्रशिक्षित व तज्ज्ञ समुपदेशकांची निवड केली आहे.           

ठाणे जिल्हातून २९ समुपदेशंकांची याकमी निवड करण्यात आली आहे. पालक व विद्यार्थी या समुपदेशकांशी प्रत्यक्ष फोनवर, ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधु शकतील. आपल्या मनातील शंका आणि संभ्रमाचे निरसन या माध्यमातून निश्चितच केले जाणार आहे. तरी जास्तीजास्त पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा शिक्षक आघाडीने केले आहे