कोरोनाबााधितांना मोफत उपचार द्या – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी

कल्याण : कल्याण.डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्णांंवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यामातून मोफत उपचार करण्याबाबतची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी

 कल्याण : कल्याण.डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्णांंवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यामातून मोफत उपचार करण्याबाबतची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेसाठी मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय १ मे महाराष्ट्र दिनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे. असे असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक परिपत्रक काढून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत .त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. पांढऱ्या रेशनकार्डधारकांना आता बिल का आकारले जात आहे ? राज्य शासनाने राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत उपचार देण्याचे जाहीर केलेले असताना महानगरपालिकेमार्फत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणे हे अत्यंत चुकीचे असून लॉकडाऊन काळात अनेकांवर आर्थिक संकट कोसळले असुन अशा काळात नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कोरोना योद्धे पुढे येऊन अत्यावश्यक सेवेत सहभागी झाले आहेत. दुर्दैवाने त्यातील काहींना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांनाही उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे, याशिवाय अनेक पोलीस व इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींनाही हा निर्णय जाचक ठरत आहे. तरी, त्वरित आपण लक्ष घालून कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांवर मोफत उपचार करण्याबाबत कल्याण – डोंबिवली महानगरपालिका प्रशासनास आदेश द्यावे, अशा आशायाचे पत्र मुख्यमंत्र्यांना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिले आहे.