२५ डिसेंबरपासून ठाणे पोलीस ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ साठी मोहीम राबविणार

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याला खिळा चाट देत ई-चलनाद्वारे (e-currency)  रोज तब्बल १० लाखाचा महसूल सरकारी तिजोरीत जमा होत असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील (Deputy Commissioner of Police Balasaheb Patil) यांनी सांगितले. मागील १३ दिवसांच्या कारवाईत वाहतूक पोलिसांनी एक कोटी ३१ लाखांची विक्रमी वसुली केलेली आहे.

ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालकावर वाहतूक पोलिसांची करडी नजर आहे. तर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली असून २५ डिसेंबर ( December 25 ) पासून वाहतूक पोलीस आता ड्रिंक अँड ड्राईव्हची ( ‘Drink and Drive’ ) मोहीम राबविणार आहे. दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याला खिळा चाट देत ई-चलनाद्वारे (e-currency)  रोज तब्बल १० लाखाचा महसूल सरकारी तिजोरीत जमा होत असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील (Deputy Commissioner of Police Balasaheb Patil) यांनी सांगितले. मागील १३ दिवसांच्या कारवाईत वाहतूक पोलिसांनी एक कोटी ३१ लाखांची विक्रमी वसुली केलेली आहे. आता २५ डिसेंबरपासून तळीराम रडारवर असल्याचेही स्पष्ट केले.

२०२० या वर्षात वाहतूक पोलिसांनी वर्षभरात आतापर्यंत दंडात्मक कारवाई करून ४ लाख २३ हजार गुन्हे दाखल करून २५ कोटी ५ लाख रुपयांची वसुली केलेली आहे. राज्यात आणि ठाण्यात बहुतांश अपघात हे अंमली पदार्थ आणि मद्याच्या नशेत धुंद असतानाही वाहन चालविल्याने होत असल्याचे स्पष्ट झाल्याने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि ख्रिसमस सणासाठी मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांना वाहतूक विभागाने कारवाईचा गंभीर इशारा दिला आहे. त्याची अंमलबजावणी २५ डिसेंबरपासून होणार आहे.

ब्रेथएनेलायझरची तपासणी पाईप प्रत्येक चालकांसाठी स्वतंत्र राहणार कोव्हीडचा प्रादुर्भाव पाहता यंदा वाहतूक पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्हसाठी विशेष उपायोजना केली आहे. तपासणीसाठी असलेल्या पोलिसांना फेसशील्ड, मास्क, आणि ब्रेथएनेलायझर सह सज्ज राहणार आहे. त्यातच कोव्हिडचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून ड्रिंक अँड ड्राइव्ह तपासणी करताना ब्रेथएनेलायझरचा पाईप हा प्रत्येक वाहनचालकाला स्वतंत्र वापरण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना कोव्हिडपासून सुरक्षा मिळणार आहे.

२०१९ मध्ये वाहतूक विभागाने १८ वाहतूक उपविभाग निर्माण केले आणि दंडात्मक ई-चलन पद्धतीने आकारणी सुरु केली. १४ फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत ६ लाख ३० हजार २०४ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून दंडापोटी २१ कोटी १४ लाख रुपयांची वसुली केलेली आहे. तर १ जानेवारी, २०२० ते १३ डिसेंबर या कालावधीत वाहतूक विभागाने १८ उपविभाग मिळून केलेल्या एकंदर कारवाईत वाहतूक पोलिसांनी ४ लाख २३ हजार गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून २५ कोटी ५ लाखाची वसुली केलेली आहे. वाहतूक नियम उल्लंघन आणि ड्रिंक एन्ड ड्राइव्ह अंतर्गत प्रतिदिन १० लाख रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात येत आहे.

नव्या वर्षाचे स्वागत निश्चितच करावे पण मद्य किंवा अंमली पदार्थ घेऊन वाहन चालविण्याने अपघाताच्या संख्येत भर पडत आहे. गेल्या वर्षीही अपघातांची संख्या मोठी होती. यंदाही कोव्हिड जरी असले तरीही अपघात घडलेले आहेत. त्यामुळे मद्य किंवा अंमली पदार्थाच्या अंमलाखाली वाहन चालू नये. नशेच्या अधीन राहून वाहन चालविल्याने देशभरात वर्षाला १ लाख ३४ हजार लोक अपघाती मृयू होतात. तर महाराष्ट्रात वर्षाला किमान १३ हजार हे अपघाती मृत्यूमुखी पडतात. २५ डिसेंबर पासून ड्रिंक एन्ड ड्राईव्ह मोहीम सुरु करणार असून नशेत वाहन चालविणाऱ्यावर कडक कारवाई करणार आहे.