निधी वाटपावरून ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी शिवसेनेत जूंपली

ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत निधी वाटपावरून वाद सुरु असतानाच महापौरांनी राष्ट्रवादीची गरज नसल्याचे विधान केले. या विधानावर माजी खासदार आनंद परांजपे यांनी महापौर नरेश मस्के यांना राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा बिनविरोध महापौर झाला. याची आठवण करून दिली.

    ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कोरोना प्रतिबंधाच्या लसी मिळत नाहीत. तर महासभेतसुद्धा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा आवाज दाबला जातो. या विरोधात विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण यांनी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत महापौर नरेश मस्के यांना जाब विचारला.

    ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत निधी वाटपावरून वाद सुरु असतानाच महापौरांनी राष्ट्रवादीची गरज नसल्याचे विधान केले. या विधानावर माजी खासदार आनंद परांजपे यांनी महापौर नरेश मस्के यांना राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा बिनविरोध महापौर झाला. याची आठवण करून दिली.

    यासंदर्भात बोलताना ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवीदचे गटनेते नजीब मुल्ला म्हणाले की, “महापालिकेतील सर्व नगरसेवक हे निधी वाटपावरून नाराज आहेत. प्रत्येक वेळी आंदोलन करून नाही तर आपापसात बसून सर्व निर्णय घेतले पाहिजेत. ज्या ठिकाणी पक्षाला विरोधाची भूमिका घायची आहे त्या ठिकाणी ती घेणारच. राज्यात जरी आम्ही एकत्र असलो तरी महापालिकेत विरोधी पक्षाप्रमाणेच भूमिका घेणार.”

    या सर्व प्रकरणावर महापौर नरेश मस्के म्हणाले की, “ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांचं पुर्णपणे बहुमत आहे. राष्ट्रवादी पक्षाने आनंद परांजपे यांना महापौर पदाच्या निवड प्रक्रियेत घेतले नव्हते. त्यामुळे त्यांना या बद्दल काही माहित नाही. गटनेते नजीब मुल्ला यांनी मला संपर्क केल्यानंतर ही प्रक्रिया झाली. आपण आघाडीत आहोत म्हणजे पाहिजे तेव्हा आघाडीचा फायदा घ्यायचा आणि पाहिजे तेव्हा विरोध करायचा अशा भूमिकेवरून तर आम्हला आघाडीची गरज नाही. आम्ही आरती घेऊन गेलो नव्हतो.” असे स्पष्टीकरण नरेश मस्के यांनी दिले आहे.