ganesh naik

नवी मुंबई शहरातील मृत्यू(corona death in navi mumbai) रोखण्यासाठी अर्थसंकल्पातील सर्वाधिक निधी वापरून उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार गणेश नाईक(ganesh naik isntructions to NMMC) यांनी केली.

  नवी मुंबई : आमदार गणेश नाईक(Ganesh Naik) यांनी मंगळवारी नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर(Abhijit banger) यांच्याबरोबर झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक बैठकीत कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी वेळीच उपाययोजना करा, अशी सूचना केली. शहरातील मृत्यू रोखण्यासाठी अर्थसंकल्पातील सर्वाधिक निधी वापरून उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली.

  यावेळी माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी सभापती अनंत सुतार यांच्यासह माजी नगरसेवक आणि समाजसेवक बैठकीस उपस्थित होते.

  एप्रिल महिन्यात नवी मुंबईत कोरोनाचे २०० बळी गेले आहेत याकडे गणेश नाईक यांनी लक्ष वेधले. अद्यापही रूग्णांना आयसीयू, व्हेंटीलेटर बेड मिळत नसल्याबददल आमदार नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.

  पाच ते सहा हजारापर्यंत साधे बेड, ऑक्सिजनचे अडीच ते तीन हजारांपर्यत बेड, आयसीसूचे दीड ते दोन हजार, व्हेंटीलेटरचे दीड हजार बेड तयार ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगत, अर्थसंकल्पातील जास्तीत जास्त रक्कम कोरोना नियंत्रणासाठी वापरावी, अशी सूचना त्यांनी आयुक्तांना केली.

  मागील काही दिवसांत रूग्णांचे आकडे जरी कमी झाले असले तरी मृत्यू वाढले आहेत. उपचारांतील हलगर्जीपणा, औषधांची अनुपलब्धतेने रूग्ण दगावता कामा नये असे होता कामा नये, असे निक्षून सांगितले नागरी आरोग्य केंद्रे व रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आलेली कोरोना चाचणी केंद्रे पुन्हा सुरू करावीत, असा सल्लाही दिला.

  त्यावर प्रतिदिन सात हजार पेक्षा जस्य चाचण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले. पालिकेने स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प युध्द पातळीवर उभा करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. १८ ते४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र स्थापन करावे. जो प्रभाग भौगोलिकददृष्टया मोठा आहे. त्यामध्ये दोन केंद्रे सुरू करावीत. बालकांना देखील लस उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली.

  कोरोनाच्या पुढील लाटांमध्ये बालकांना संसर्गाची भिती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे बालरोग विभाग तत्पर ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला नवी मुंबईकरांचे मोफत लसीकरण करावे, या मागणीचा नाईक यांनी पुनरूच्चार केला.

  सर्वसामान्यांना कोरोनावर मोफत उपचार मिळावेत यासाठी खाजगी रूग्णालयांना परिपत्रक काढून पालिकेने निर्देष द्यावेत त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही याचे निदान करण्यासाठी करण्यात येणारी एचआरसीटी स्कॅनिंग लवकरात लवकर होण्यासाठी खाजगी संस्थांचा सहभाग घ्यावा.अशा सुचना माजी आमदार संदीप नाईक यांनी केल्या. त्यावर आयुक्त बांगर यांनी होकार दर्शवला.

  कोरोनामुळे एखाद्या रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचे बिल कमी करण्यासाठी पालिकेने माणुसकीच्या दृष्टीकोणातून संबधीत रूग्णालयाला सांगावे, अशी अपेक्षा आमदार नाईक यांनी बैठकीत व्यक्त केली.

  ते पुढे म्हणाले, होल्डिंग पाॅन्डच्या सफाईसह इतर पावसाळापूर्व कामे हाती घ्यावीत. कोरोना मेडिकल किट रूग्णाच्या घरी पोहोच करावे. अंथरूणावर खिळलेल्या रूग्णांची कोरोना चाचणी आणि लसीकरण त्याच्या घरी जावून करावे. पावसाळयात डेंग्यू आणि मलेरियासारखे साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी जंतूनाशक फवारणीसारख्या उपाययोजना कराव्यात.

  त्यांनी सांगितले की, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रत्येक नोडमध्ये माता बाला रूग्णालय बांधावे. एमआयडीसी व सिडकोकडून सुविधा भुखंड हस्तांतर करून घेत त्यावर हाॅस्पिटले उभारा. सिडकोने रूग्णालयांसाठी बांधलेल्या मात्र काही कारणास्तव वापरावीना पडून असलेल्या इमारती पालिकेने ताब्यात घेऊन, त्या ठिकाणी रूग्णालये सुरू करावीत. मजूर, बेकार, निराधार, विस्थापित मजूर, दुर्लक्षित ज्येष्ठ इत्यादी वंचित घटकांसाठी पालिकेने कम्युनिटी किचन सुरू करून त्यांना मोफत अन्न व धान्य पुरवावे.

  बेलापूर येथे ४८५ खाटांचे क्वारंटाईन सेंटर

  सेक्टर १५ मयुरेष प्लॅनेट बेलापूर येथे महापालिका ४८५ बेडचे कोरोना विलगीकरण सेंटर सुरू करीत असून या सेंटरची आमदार गणेश नाईक यांनी पाहणी केली. आमदार नाईक यांच्या आवाहनानुसार समाजातून मदतीचे अनेक हात पुढे आले असून अशा नागरिकांचे कौतुक करत सर्वांनी कोरोनाला हरविण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन आमदार नाईक यांनी यावेळी केले.

  पालिका खरेदी करणार आणखी एक स्कॅन मशीन

  सध्या वाशी येथील रूग्णालयात पालिकेचे एचआरसीटीची एक मशीन आहे. दुसरे मशीनही पालिकेने खरेदी केली असून ती वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथील कोविड रूग्णालयात ठेवण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेशी जोडून सोसायटयांमध्ये लसीकरण सेंटर सुरू करण्यासही आयुक्त बांगर यांनी अनुकुलता दर्शवली.