कोरोना रुग्णांवर मोफत उपचार देण्याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेला आदेश द्या – आ. गणपत गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण : कोरोना रुग्णांंवर उपचारासाठी शुुल्क आकारणीचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घेेेतला आसुन मनापाने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा

कल्याण : कोरोना रुग्णांंवर  उपचारासाठी शुुल्क आकारणीचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घेेेतला आसुन मनापाने  कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा याकरिता आदेश देण्याची मागणी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कोरोना रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य सरकारने १ मे रोजी जाहीर केला होता. मात्र केडीएमसी प्रशासनाने काही दिवसांपूर्वी एक पत्रक काढून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणीचे दर निश्चित केले आहेत. एकीकडे राज्य शासनाने कोरोना रुग्णांवर १०० टक्के मोफत उपचार करण्याचे जाहीर केलेले असताना महापालिकेने शुल्क आकारणीचे काढलेले पत्रक चुकीचे असल्याचे आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये असंतोष पसरत असून हा निर्णय मागे घेण्यासाठी आपण पालिका प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.