अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सगळ्यांची कोरोना तपासणी करा – आमदार गणपत गायकवाड

कल्याण : कोरोनाच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, रुग्णांना सेवा देणारे रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णवाहिका चालक, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र

कल्याण : कोरोनाच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, रुग्णांना सेवा देणारे रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णवाहिका चालक, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी, जीवनावश्यक वस्तू व औषध विक्रेते, अत्यावश्यक सेवा देणारे वाहन चालक आणि बस चालक व वाहक, बातम्या आणि माहिती लोकांपर्यंत पोचविणारे पत्रकार, कॅमेरामन आणि फोटोग्राफर तसेच सफाई कामगार अश्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वाची तातडीने कोरोनाची तपासणी करा, अशी मागणी कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.