प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कल्याण – कल्याण-शीळ मार्गावर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक स्त्री जातीचे अर्भक सापडले आहे. शनिवारी (दि १८ जुलै) पावसात नवजात अर्भकाला कचऱ्यात टाकले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटना स्थळी रवाना झाले. त्यांनी अर्भकाला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले आहे. 

कल्याण-शीळ मार्गावर कचऱ्याचा ढिगाऱ्यात बाळ रडत असल्याचा आवाज ये-जा करणाऱ्या नागरिकांना आला. नागरिकांनी कचऱ्याचा ढिगारा बाजूला केला असता कपड्यात गुंडाळलेले आढळले. या घटनेची माहिती पोलीसंना कळताच ते तात्काळ घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांनी अर्भकाला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले आहे. अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस म्हणाले की, शनिवारी खुप पाऊस होता. महामार्ग असल्याने गाड्यांची वर्दळही जास्त होती. तेव्हाच कोणीतरी अर्भकाला ठेवले आहे. हे बाळ नुकतेच जन्मलेले आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात बाळाच्या पालकांचा शोध सुरु आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल. असे सी. जे. जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शीळ डायघर यांनी म्हटले आहे.